राजगाटाचक, गडचिरोली - 442704 +91 9579774624

राजगाटाचक ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायत राजगाटाचक

स्वच्छ गाव | सुंदर गाव | प्रत्येक पाऊल प्रगतीकडे

गावाची लोकसंख्या (२०११ नुसार)

1183
एकूण लोकसंख्या
510
पुरुष
471
स्त्रिया
230
कुटुंब संख्या
Village Activity
आमची भूमिका

मनोगत

राजगाटाचक: निसर्गाच्या कुशीत वसलेले एक स्वयंपूर्ण गाव गडचिरोली शहरापासून पूर्वेस अवघ्या १० कि.मी. अंतरावर वसलेले 'राजगाटाचक' हे एक अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि हरित गाव आहे. निसर्गाची मुक्त उधळण लाभलेले हे गाव आपल्या शांत आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखले जाते. ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावाने स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे.

वनसंपदा आणि पर्यावरण: गावाच्या उत्तरेस अवघ्या १ कि.मी. अंतरावर विस्तीर्ण असे झुडपी जंगल पसरलेले आहे. हे जंगल गावाच्या सौंदर्यात भर तर घालतेच, पण ते अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान देखील आहे. या जंगलात विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती आणि वन्य प्राणी आढळून येतात.
Message
प्रेरणादायी संदेश

शुभेच्छा संदेश

गडचिरोली जिल्ह्यातील 'राजगाटाचक' गावाला भेट दिल्यानंतर पहिले लक्ष जाते ते म्हणजे स्वच्छतेकडे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गावाने उत्कृष्ट कामगिरी बजावत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला, ही बाब भूषणावह आहे.

येथे महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतून खेडी विकसित होत आहेत. गावाने विविध पुरस्कार मिळवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजगाटाचक गाव 'हिरवेबाजार' आणि 'पाटोदा' गावांप्रमाणे राज्याच्या नकाशावर झळकेल, असा मला विश्वास आहे.
Governance
ISO 9001:2015 Certified

सुशासनयुक्त गाव

ग्रामपंचायत राजगाटाचक ही ISO मानांकित ग्रामपंचायत असून येथे पारदर्शक प्रशासन राबवले जाते.
  • डिजिटल सेवा: 2020 पासून ग्रामपंचायत 'पेपरलेस' झाली असून QR कोडद्वारे कर भरणा सुविधा उपलब्ध आहे.
  • लोकसेवा हक्क: नागरिकांना ७ दिवसांच्या आत विविध दाखले दिले जातात.
  • पुरस्कार: अमृत महा आवास, स्मार्टग्राम आणि स्वच्छता अभियानात विविध स्तरांवर पुरस्कार प्राप्त.
  • पाणी पुरवठा: 'हर घर जल' अंतर्गत १००% नळ जोडणी पूर्ण.

गावाची भौगोलिक माहिती

एकूण क्षेत्रफळ 454.93 हे. आर.
पिकाखालील क्षेत्र 251.19 हे. आर.
वनाखालील क्षेत्र 122.30 हे. आर.
पाण्याखालील क्षेत्र 71.8 हे. आर.
मुख्य पिके भात, हरभरा, तूर
जॉब कार्ड कुटुंबे 340