Program

संविधान दिन साजरा व संविधान रॅली – ग्रामपंचायत मारोडा

ग्रामपंचायत मारोडा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला व “संविधान रॅली” भव्य स्वरूपात काढण्यात आली. नागरिकांना संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांची माहिती देत जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थी, युवक, महिला, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत देशभक्तीचे गीत, घोषवाक्ये आणि संविधानाबाबत संदेश देत समाजात जागरूकता निर्माण केली. संविधान दिनाचा कार्यक्रम सामाजिक एकतेचा, नागरी कर्तव्याची जाणीव आणि लोकशाहीबद्दल अभिमान वाढवणारा ठरला.