Program

अभियान ग्रामसभा – मारोडा ग्रामपंचायत

मारोडा ग्रामपंचायतीत “अभियान ग्रामसभा” उत्साहात व यशस्वीपणे पार पडली. ग्रामविकास, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, महिला व बालविकास, शेती, रोजगार, शासन योजनांचा लाभ व इतर विकास विषयांवर सविस्तर चर्चा घेण्यात आली.
ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली मते, सूचना व अपेक्षा मांडत ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामविकासासाठी नागरिकांचा सहकार्यभाव आणि सहभाग प्रेरणादायी ठरला.